मराठी भावगीत म्हटले की काही नावे खास आठवतात. ती म्हणजे खळे, पाडगावकर,दत्त,दाते ,इत्यादी .ना.घ.च्या शीळ या काव्या पासून मराठी भावगीताला प्रारंभ झाला असे आधुनिक समीक्षक मानतात परंतु भावगीताची बीजे आपणांस थेट प्राचीन साहित्यातही जाणवतात .संत ज्ञानदेव, नामदेव,एकनाथ,तुकारामादी संतांच्या अभंगातून ही या प्रकारच्या कव्याची लक्षणे आणि काव्यगुण दिसतात.
अलीकडच्या काळात मराठी भावगीत समृद्ध बनले.मराठी भाषेला आणि संस्कृतीलाकुंड समृद्ध करणारा हा दिव्य वारसा पुढे नेण्यात अनेकांचे योगदान आहे.त्यात गायक,संगीतकार, आणि कवी यांचा मौलिक वाटा आहे! असेच मराठी भाव क्षितिजवरील तेजस्वी तारा म्हणजे गायक अरुण दाते! त्यांनी गायलेली अवीट गोडीची मखमली गाणी मराठी रसिकांच्या मनात अजूनही रुंजी घालतांना दिसते!!
अरुण दाते यांचे बालपण इंदोरला गेले.रामू भैया दाते हे त्यांचे वडील.संगीताची सखोल जाण असणाऱ्या वडिलांकडून त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले.रामू भैया कडे अनेक दिग्गज गायक,संगीतकार येत,त्यांच्या मैफली रंगत, यांचा नकळत परिणाम अरुण दाते यांच्यावर झाला.
अरुण दाते व्यवसायाने टेक्स्टाईल इंजिनियर. परंतु काही कालावधी नंतर त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ गायकीला दिला.सुरुवातीला गजल गायक म्हणून ते सर्वांना परिचित झाले परंतु त्यांच्या आयुष्यात नियतीने दुसरेच तेजपर्व समोर आणले. भावगीताच्या क्षितिजावर तेजस्वी शुक्र उदया पूर्वीची ही गोष्ट !
श्रीनिवास खळे म्हणजेच मराठी गीतांना श्रावणाच्या घननील आकाशाप्रमाणे आणि इंद्रधनूच्या सप्तरंगी स्वरांनी न्हाऊ घालणारा अभिजात संगीतकार ! त्यांनी अरुण दाते यांचा आवाज ऐकला आणि पाडगावकरांच्या "शुक्रतारा "या गाण्यासाठी त्यांची निवड केली.अर्थात या गाण्यापूर्वी मराठी गाणे त्यांनी गायलेले नसल्याने हे गाणे गाण्यासंबंधी त्यांच्या मनात संभ्रमहोता ,परंतु आपल्या वडिलांच्या आदेशाने आणि खळे काकांच्या स्नेहल आग्रहाने त्यांच्या आणि सुधा मल्होत्रा यांच्या आवाजात हे गाणे रेकॉर्ड झाले आणि मराठी भावसंगीताच्या इतिहासातील एका तेजस्वी पर्वाला प्रारंभ झाला .या गीताने इतिहास रचला.मराठी रसिकांच्या मनातील तरल भावनेला या गाण्याने साद घातली ."" तू अशी जवळी रहा " या स्वरांची जादुई लकेर त्यांच्या भावगर्भि कायमची स्थिरावली .प्रेमिकांच्या अबोल प्रीतीला या गाण्याने उजागर केले! नंतर शुक्रतारा आणि अरुण दाते हे समीकरण इतके दृढ झाले होते की तो एक द्वंद्व समासच बनला .पुढे ""शुक्रतारा"" हा कार्यक्रम घेऊन अरुण दाते मराठी रसिकांच्या भेटीला आले.हा कार्यक्रमही महाराष्ट्रात आणि विदेशातही खूप गाजला 2500 हुन अधिक प्रयोग या कार्यक्रमाचे त्यांनी केले.यातील 5पाच कार्यक्रमांच्या आयोजनाची मला प्रत्यक्ष संधी आणि अरुणजींचा सहवास लाभला हे माझ्या आयुष्यातील सोनेरी क्षण !
स्वर गंगेच्या काठावर ती,अखेरचे येतील माझ्या,दिवस तुझे हे,पहिलीच भेट झाली, या जन्मावर ,भातुकलीच्या,डोळे कशासाठी, भेट तुझी माझी ,जेंव्हा तिची नि माझी, डाव मांडून, संधिकाली या अशा,मान वेळाऊनी धुंद ,अशी कितीतरी बहारदार गाणे त्यांच्या मखमली आवाजात स्वरांचे कोंदण लेऊन आवपल्यासमोर आली.मराठी भाषा, साहित्य, आणि कला अशा एकुणातच मराठी संस्कृतीमध्ये मराठी भावगीतांचे स्थान हे आढळ बनले.ना घ .च्या रानावनातील ही शीळेने गगनाला गवसणी घातली. आणि मराठी भावसंगीताच्या क्षितिजावर हा शुक्रतारा कायमचा स्थिरावला!
अशोक लिंबेकर ,संगमनेर