Thursday, December 8, 2016
Tuesday, December 6, 2016
Tuesday, July 19, 2016
Thursday, July 7, 2016
मराठी माणसाच्या लोकमानसात ध्रुवस्थान प्राप्त केलेले गाव म्हणजे पंढरपूर ! किंबहुना आपल्या भावविश्वात हे गाव अगदी लहानपणीच नांदायला येते .या गावाची अशी वेगळी ओळख मुळी करून द्यावीच लागत नाही .मराठी संताच्या अभंगवाणीतून पंढरपूरची ही भक्तीगंगा ओसंडून वाहते .तिच्या या प्रवाहीपणामुळेच आजही हा भक्तीप्रवाह चैतन्याची नवी नव्हाळी लेऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुराकडे झेपावत आहे .वर्षानुवर्षाचा हा नित्यक्रम म्हणजेच वारी ! आपल्या मनातील मळभ ,वंचना दु:ख ,दैन्य , आणि आकांक्षा विठ्ठलचरणी अर्पण करून मराठी माणूस नितळ आणि रित्या मनाने जीवन जगण्याची नवी उर्जा घेऊन मागे परतोनी पाहत आपल्या भागध्येयाला सामोरे जातो.म्हणूनच तमाम मराठी माणसाला जगण्याची उर्जा देणारे हे हे भक्तीपीठ म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे शक्तीपीठ आणि उर्जाकेंद्र आहे .जर विठ्ठलभक्तीचा आधार नसता तर मराठी माणसाचे ,तमाम कष्टकऱ्यांचे संसार कोणी सावरले असते ? हा जगण्याचा मानसिक आधार नसता तर अजून किती जीवनयात्रा संपल्या असत्या ? वारकरी पंथाचे हे अमूल्य योगदान वैश्विक दृष्ट्या अतुलनीय आहे .
Thursday, June 2, 2016
निकाल लागला .दहावी ,बारावीनेर काय ? असा प्रश्न सर्व पाल्कासमोर आणि त्यांच्या पाल्यासमोर पडलेला ,सर्वांचे चेहरे चिंताग्रस्त ,पुढे काय होणार/ कुठे नंबर लागणार ? जे होणार ते होणारच आहे ,काही गोष्टी अटल असतात ,जे घडायचे आहे ते घडणारच असते मग काळजी का करायची ,आपल्या काळजीने काही फरक पडत नसतो,पण एक मात्र खरे आहे; तुमच्या या काळजीचा,चिंतेचा आणि आपल्या मुलाबाबतच्या अवास्तव अपेक्षा ,इच्छा -आकांक्षेचा या भांडवलशाही अर्थव्यस्थेतील शिक्षणाच्या बाजारपेठेने अचूक फायदा घेतला आहे .ही मानसिकता बदलायला हवी ,मुलाचा काळ लक्षात घ्यायला हवा .त्याचे मालक बनण्यापेक्षा पालक बनायला हवे.
Subscribe to:
Comments (Atom)
मराठी भावगीत !
मराठी भावगीत म्हटले की काही नावे खास आठवतात. ती म्हणजे खळे, पाडगावकर,दत्त,दाते ,इत्यादी .ना.घ.च्या शीळ या काव्या पासून मराठी भ...
-
नगरेची रचावी | जलाशये निर्मावी | महावने लावावी | नानाविध |'' असे म्हणून संत ज्ञानदेव पर्यावरण संवधर्न चा विचार देतात ,तर संत तुकार...










