Thursday, June 2, 2016

निकाल लागला .दहावी ,बारावीनेर काय ? असा प्रश्न सर्व पाल्कासमोर आणि त्यांच्या पाल्यासमोर पडलेला ,सर्वांचे चेहरे चिंताग्रस्त ,पुढे काय होणार/ कुठे नंबर लागणार ? जे होणार ते होणारच आहे ,काही गोष्टी अटल असतात ,जे घडायचे आहे ते घडणारच असते मग काळजी का करायची ,आपल्या काळजीने काही फरक पडत नसतो,पण एक मात्र  खरे  आहे; तुमच्या या काळजीचा,चिंतेचा आणि आपल्या मुलाबाबतच्या अवास्तव  अपेक्षा ,इच्छा -आकांक्षेचा या भांडवलशाही  अर्थव्यस्थेतील शिक्षणाच्या बाजारपेठेने  अचूक फायदा घेतला आहे .ही मानसिकता बदलायला हवी ,मुलाचा काळ लक्षात घ्यायला हवा .त्याचे मालक बनण्यापेक्षा पालक बनायला हवे.

Wednesday, June 1, 2016

नगरेची रचावी | जलाशये निर्मावी | महावने लावावी | नानाविध |'' असे म्हणून संत ज्ञानदेव पर्यावरण  संवधर्न चा विचार देतात ,तर संत तुकाराम'' सिंचन करिता मूळ| वृक्ष ओलावे सकळ ''असे  म्हणणारे तुकाराम आजच्या ठिबक सिंचनाचाच विचार व्यक्त करत नाहीत का?

मराठी भावगीत !

मराठी भावगीत म्हटले की काही नावे खास आठवतात. ती म्हणजे खळे, पाडगावकर,दत्त,दाते ,इत्यादी .ना.घ.च्या शीळ या काव्या पासून मराठी भ...